नवी दिल्ली :- आंतरराष्ट्रीय टी-20 सामना केवळ 3.2 षटकांत संपल्याचे कधी ऐकले आहे का. मात्र, हे खरेच घडले आहे. केनिया आणि कॅमेरून या दोन संघात झालेला टी-20 सामना असाच 3.2 षटकांत संपला.
प्रथम फलंदाजी करताना कॅमेरूनने 14.2 षटकात सर्वबाद 48 धावा केल्या. केनियाकडून यश तालातीने 8 धावांत तर शेम नोचेने 10 धावांत प्रत्येकी 3 गडी बाद केले. लुकाने 2 तर, गेरार्डने 1 बळी घेतला.
विजयासाठी 49 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केनियाने 3.2 षटकात 1 गडी गमावून विजय साकार केला. रूशब पटेलने 14 तर सुखदीप सिंहने 10 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. नेहेमिआहने नाबाद 7 धावा करत सामना 3.2 षटकात संपवला.
यापूर्वी ऑस्ट्रियाने तुर्कस्तानवर 104 चेंडू आणि 10 गडी राखून विजय मिळवला होता. तर, ओमानने फिलिपिन्सचा 103 चेंडू आणि 9 गडी राखून पराभव केला होता. लक्सेम्बर्गने तुर्कस्तानचा 101 चेंडू आणि 8 गडी राखून पराभव केला होता.