मुंबई – बॉलीवूडचे ट्रेंडिंग कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नानंतरचा प्रत्येक सण एकत्र साजरा करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले आहेत. मात्र लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेंटाइन डे हे दोघं सोबत साजरा करू शकणार नाही. कतरिना तिच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त असल्यामुळे व्हॅलेंटाईन करू शकणार नाही आहे.
कतरिना कैफ तिच्या आगामी चित्रपट टायगर 3 च्या शूटिंगमुळे पती विकी कौशलसोबत व्हॅलेंटाईन साजरा करू शकणार नाही. सलमान आणि कतरिनाच्या टायगर 3 चे शेवटचे शेड्यूल जानेवारीत शूट होणार होते. मात्र कोविड 19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे दिल्लीचे वेळापत्रक रद्द करावे लागले. वृत्तानुसार, निर्मात्यांनी शूटिंगचे नवीन शेड्यूल आखले आहे.फेब्रुवारीच्या मध्यात हे शेड्यूल 15 दिवसांचे असणार आहे ज्यामध्ये सिक्वेन्सवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यामुळे कतरिनाला व्हॅलेंटाईन साजरा करता येणार नसल्याचे चित्र आहे.
दिल्लीत शूट होणार अॅक्शन सीन
दिग्दर्शक मनीष शर्मा यांना चित्रपटाचे काही अॅक्शन सीन दिल्लीच्या रस्त्यावर चित्रित करायचे आहेत. सलमान दिल्लीतील अनेक ऐतिहासिक ठिकाणी शूटिंग करणार आहे, ज्यामध्ये लाल किल्ल्याजवळील परिसराचा समावेश आहे.