बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नाच्या एका आठवड्यानंतर कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवरील प्रोफाइल फोटो बदलला आहे.
View this post on Instagram
तिने आता तिचा प्रोफाइल फोटो म्हणून विकीसोबतचा एक रोमॅंटिक फोटो ठेवला आहे.
कतरिनाचा नवीन प्रोफाइल फोटो विकी कौशलसोबतचा आहे. हा फोटो त्यांच्या लग्नाच्या दिवशी काढण्यात आलेला आहे. या फोटोत दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघताना दिसत आहेत. कतरिनाने हा फोटो लग्नानंतर सोशल मीडियावरदेखील शेअर केला होता.
View this post on Instagram
कतरिना आणि विकी कौशलचे लग्न 9 डिसेंबरला सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये पार पडले. या शाही लग्नसोहळ्यात फक्त त्यांच्या जवळच्या लोकांनी हजेरी लावली होती.
View this post on Instagram
लग्नाच्या काही तासांनंतर या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. या फोटोंवर कॅप्शन लिहिली होती, तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्ही या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहोत.
View this post on Instagram
कतरिना आणि विकीच्या लग्नानंतर 20 डिसेंबरला मुंबईत भव्य रिसेप्शन होणार आहे. या कार्यक्रमात बॉलीवूडच्या अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. रिसेप्शनची तयारीदेखील सुरू झाली आहे.