पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिवसैनिकांनी आक्रमक; कर्नाटकच्या वाहनांच्या नंबरप्लेट वर फासलं काळं, तर काचेवर लिहलं जय महाराष्ट्र

Updated On:

– सतेज औंधकर

कोल्हापूर – बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. तसेच कर्नाटकच्या ट्रकच्या भगव्या रंगाने काचेवर जय महाराष्ट्र लिहलं तर नंबर प्लेट वर काळं फासलं. 

यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

यावेळी शिवसेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या दोन ट्रक ना लक्ष करत काचेवर जय महाराष्ट्र लिहित नंबर प्लेट वरती काळं फासलं. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गांधीनगर पोलिसात घेऊन गेले. दरम्यान आंदोलनामुळे झालेली वाहतुकीची कोंडी महामार्ग पोलिसांनी जवळपास दीड तासांपेक्षा अधिक काळ केलेल्या प्रयत्नानंतर पूर्ववत झाली.

आणखी संबंधित बातम्या

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून 'या' नावांची चर्चा

2026-04-02 19:35:59

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून 'या' नावांची चर्चा

Shivsena: शिवसेना शिंदे गटातून 'या' नेत्याची हकालपट्टी; राजकीय वर्तुळात खळबळ, जाणून घ्या कारण

2026-04-02 18:26:54

Shivsena: शिवसेना शिंदे गटातून 'या' नेत्याची हकालपट्टी; राजकीय वर्तुळात खळबळ, जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: "२५ ते ३० आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विलीन होणार"; नेमका कोणी केला दावा ?

2026-04-02 11:38:53

Maharashtra Politics: "२५ ते ३० आमदारांसह राष्ट्रवादी पक्ष भाजपमध्ये विलीन होणार"; नेमका कोणी केला दावा ?

Jyotiba Chaitra Yatra 2026 : जोतिबाच्या नावानं चांगभलं..! चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने जोतिबाचा डोंगर दुमदुमला

2026-04-01 21:53:32

Jyotiba Chaitra Yatra 2026 : जोतिबाच्या नावानं चांगभलं..! चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने जोतिबाचा डोंगर दुमदुमला

Vijay Shivtare : बापासाठी लेक झाली ढाल! शिवतारेंना मुलीकडून किडनीदान; पती शिवदीप लांडेंकडून कौतुकाची थाप

2026-03-31 13:18:47

Vijay Shivtare : बापासाठी लेक झाली ढाल! शिवतारेंना मुलीकडून किडनीदान; पती शिवदीप लांडेंकडून कौतुकाची थाप