लोणी धामणी -लोणी (ता. आंबेगाव) येथे गेली 25 वर्षे नागपंचमीच्या दिवशी लोणी गावामध्ये होणारा कलगी तुरा कार्यक्रम यावर्षी करोना या आजाराच्या संकटामुळे रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक व माजी सरपंच उद्धव लंके यांनी दिली.
गेली 25 वर्षे हा कलगीतुरा कार्यक्रम अखंडपणे चालू होता. हा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम पाहाण्यासाठी आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर तसेच पुणे परिसर व नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा भागातून मोठ्या संख्येने कलगीतुरा शौकिन येत असत.
पण यंदा हा कार्यक्रम रद्द झाल्याने त्या दिवशी कोणीही कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरकू नये, असे आवाहन कलगीतुरा मंडळ व समस्त ग्रामस्थ लोणी यांनी केले आहे.