बीजींग – रशियाची आईस स्केटिंगपटू कॅमिला वालिएवा ही डोपिंगमध्ये दोषी आढळली होती. तसेच तिचे वयही लहान असल्याचे समोर आले होते. मात्र, तरीही तिने येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत फिगर स्केटिंग प्रकारात मिळवलेले सुवर्णपदक कायम राखले जाणार आहे, असे जागतिक क्रीडा महासंघाने सांगितले आहे.
अवघ्या 15 वर्षांच्या कॅमिला हिला प्रौढ खेळाडूंचे नियम लागू करून तिला खेळापासून थांबवता येणार नाही, असा निर्णय महासंघाने घेतला आहे.