मुंबई – 20 जून हा जागतिक खोके दिन आहे. कारण ज्या लोकांनी आपल्याशी गद्दारी केली त्यांच्या गद्दारीची दखल ३३ देशांनी घेतली असा घणाघात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिबीर नुकतेच मुंबईत पार पडले. यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. या राज्यात काही लोक असे आहेत जे दुसऱ्यांचे वडील चोरणारे आहेत. मात्र आजचा दिवस चांगला आहे. आज कुणीही त्यांचं नाव घेऊ नका असा टोला आदित्य ठाकरेंनी यावेळी लगावला.
लंडनचा किस्सा सांगितला
आदित्य ठाकरे म्हणाले,”मी आत्ता लंडनमध्ये होतो तिथे मला एकाने विचारलं पुढे काय करणार? तेव्हा मी सांगितलं की 18 तारखेला शिबीर आहे, १९ ला वर्धापन दिन आहे. 20 तारखेला 50 खोके.. तेव्हा तिथून एक फॉरेनर चालला होता तोपण म्हणाला एकदम ओके. त्यामुळे परवाचा दिवस हा जागतिक खोके दिवस आहे असं ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेना वर्धापन दिनाच्या राजकीय शुभेछांवरून देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. घटनाबाह्य सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांनी उद्याच्या शुभेच्छा आजच दिल्या आहेत. दिल्लीतून त्यांना निरोप आला असेल. परवा, 20 जूनला महत्त्वाचा दिवस आहे. जागतिक खोके दिन. राष्ट्रीय खोके दिवस म्हणू नका.. जागतिक खोके दिन आहे कारण 33 देशांनी त्याची दखल घेतली आहे अशी टोलेबाजी देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.