मुंबई – शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच स्टेजवर उपस्थित असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशात शरद पवार यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत बोचरी टीका केली आहे. लग्न एकाबरोबर करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात, राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे आहे ” असं म्हणत प्रकाश आंबडेकर यांनी केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या टीकेवर सडेतोड उत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे ते म्हणाले,’“लग्न एकाशी करायचे आणि हुंडा दुसऱ्याकडून घ्यायचा, ही सवय काहींना आहे,” असं सडेतोड उत्तर आव्हाड यांनी दिल आहे.
तत्पूर्वी, प्रकाश आंबडेकर यांनी बोचरी टीका म्हटले,’जेव्हा तुम्ही गोष्टींकडे दुसऱ्या दृष्टीकोनातून पाहता, त्यावेळी गॉरमिंट आंटी बरोबर असल्याच तुमच्या लक्षात येईल. द्वेष. जातीभेद आणि मृत्यूच्या व्यापाऱ्यांच्या बाजूने तुम्हाला जायचं असेल, तर तुम्ही जाऊ शकता. या तुमच्या ब्रेकअप स्टंटने तुम्ही महाराष्ट्राच्या आणि भारताच्या लोकांना मूर्ख बनवू नका” अशी बोचरी टीका प्रकाश आंबडेकर यांनी केली आहे. तसेच शरद पवार हे नेहमीच दुटप्पी राहिले आहेत. लग्न एकाबरोबर करतात आणि संसार दुसऱ्याबरोबर थाटतात” असं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे.