Jay Shah Statement : ‘रोहितच आमचा कर्णधार!’; सूर्या समोर असतानाच जय शाह यांनी असं का म्हटलं? पाहा VIDEO

सूर्या समोर असताना रोहितचा उल्लेख ‘कर्णधार’!
नुकतेच मुंबईत रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने विश्वविजेत्या संघांचा गौरव करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकणारा पुरुष संघ, हरमनप्रीत कौरचा महिला संघ आणि ब्लाइंड महिला क्रिकेट संघ उपस्थित होता. यावेळी मंचावर भाषण करताना जय शाह यांनी रोहित शर्माकडे बोट दाखवत म्हटले की, “आमचा कर्णधार रोहित शर्मा इथेच बसला आहे. मी त्यालाच कर्णधार म्हणेन…”.
Jay Shah 🗣️: “our captain Rohit Sharma is sitting here. I am still calling you captain because under you, we won two ICC trophies”.
Jay Shah is grateful to Rohit Sharma for ending the drought of ICC trophies for India 🥹🇮🇳pic.twitter.com/7xjVZdjkwQ
— Kusha Sharma (@Kushacritic) January 8, 2026
जय शाह एवढ्यावरच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले, “रोहितने आपल्याला दोन मोठ्या ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. २०२३ मध्ये सलग १० सामने जिंकून आपण ट्रॉफी गमावली, पण लोकांची मने जिंकली होती. तेव्हा मी राजकोटमध्ये शब्द दिला होता की, आपण मनेही जिंकू आणि ट्रॉफीही! रोहितने ते करून दाखवलं.”
जय शाह यांनी हे विधान केले तेव्हा भारताचा सध्याचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव तिथेच उपस्थित होता, ज्यामुळे क्रीडा वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. जय शाह यांनी रोहितचे केलेले कौतुक हे त्याच्या कर्तृत्वाची पावती असली, तरी आता २०२६ च्या रणांगणात ‘कॅप्टन सूर्या’ भारताचा तिरंगा पुन्हा एकदा फडकवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित शर्माचा ‘सुवर्णकाळ’ –
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने गेल्या दोन वर्षात अभूतपूर्व यश मिळवले आहे.
- T20 विश्वचषक २०२४: बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
- चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: मार्च २०२५ मध्ये रोहितच्याच नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
हेही वाचा – K Lalremruata Death : धक्कादायक! फलंदाजी आटोपून पॅव्हेलियनला जाताना भारतीय क्रिकेटपटूचा अचानक मृत्यू
आता ‘सूर्या’वर ऐतिहासिक जबाबदारी –
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता टी-२० ची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. २०२६ चा विश्वचषक सूर्यासाठी आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ही स्पर्धा भारतातच होणार असल्याने घरच्या मैदानावर जेतेपद राखण्याचे आव्हान असेल. तसेच घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरण्याची भारताला संधी आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून आपली पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकून रोहितचा वारसा पुढे न्यायचा आहे





