IND W vs SL W : भारताचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय; जेमिमाचे वादळी अर्धशतक, स्मृतीने रचला इतिहास!

IND W vs SL W 1st T20I India beat Sri Lanka : भारत आणि श्रीलंका महिला संघातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला विशाखापट्टणम येथे सुरुवात झाली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ८ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने १२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने जेमिमा रॉड्रिग्जच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर केवळ १४.४ षटकांत २ बाद १२२ धावा करून पूर्ण केले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे
स्मृती मानधनाने केला खास पराक्रम –
भारताची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर शेफाली वर्मा (९) लवकर बाद झाली. मात्र, त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मानधना यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. मंधाना २५ धावा करून बाद झाली, परंतु या खेळीदरम्यान तिने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ४००० धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आणि जगातील दुसरी फलंदाज ठरली आहे.
Game. Set. Done 💪
A convincing victory in Vizag and #TeamIndia have taken a 1️⃣ – 0️⃣ lead in the series 🙌
Scorecard ▶️ https://t.co/T8EskKzzzW#INDvSL | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/MFBSTi1D84
— BCCI Women (@BCCIWomen) December 21, 2025
जेमिमाने ४४ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने नाबाद ६९ धावा ठोकल्या. तिने तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार हरमनप्रीत कौर (नाबाद १५) सोबत ५५ धावांची अभेद्य भागीदारी केली. भारतीय टी-२० इतिहासात दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी एकाच सामन्यात ५० हून अधिक धावांची भागीदारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Setting the tone 🔝
Jemimah Rodrigues is adjudged the Player of the Match for her brilliant 6⃣9⃣*(44) in the chase 🫡
Scorecard ▶️ https://t.co/T8EskKzzzW#TeamIndia | #INDvSL | @JemiRodrigues | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/KTPTqwpmsg
— BCCI Women (@BCCIWomen) December 21, 2025
भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा –
Major Milestone unlocked 🔓
Vice-captain Smriti Mandhana becomes the 1⃣st Indian and only the 2⃣nd player ever to complete 4⃣0⃣0⃣0⃣ runs in women’s T20Is 🫡#TeamIndia are 55/1 after 6 overs.
Updates ▶️ https://t.co/T8EskKzzzW#INDvSL | @mandhana_smriti | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pejpxDS2FP
— BCCI Women (@BCCIWomen) December 21, 2025
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय सार्थ ठरवताना भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला २० षटकांत ६ बाद १२० धावांवर रोखले. श्रीलंकेकडून विष्मी गुणारत्नेने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तर कर्णधार चमारी अट्टापट्टू (१५) आणि हर्षिता (२१) स्वस्तात बाद झाल्या. भारताकडून क्रांती गौड, दीप्ति शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली. श्रीलंकेचे तीन फलंदाज धावबाद झाल्यामुळे त्यांच्या धावगतीला ब्रेक लागला.
हेही वाचा – Ayush Mhatre Reaction : पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचं खापर भारतीय कर्णधाराने कोणावर फोडलं? जाणून घ्या
वैष्णवी शर्माचे यशस्वी पदार्पण –
या सामन्यातून युवा खेळाडू वैष्णवी शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिला विकेट मिळाली नसली तरी तिने ४ षटकांत केवळ १६ धावा देत अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली. एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाने आपला विजयी रथ या मालिकेतही कायम ठेवला आहे.





