BCB Demand ICC : विश्वचषकाआधी क्रिकेट विश्वात खळबळ! भारताकडून सामने हिरावून घेण्याची बांगलादेशची मागणी

Bangladesh BCB Demand ICC T20 World Cup 2026 India : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारतात होणारे आपले सर्व सामने इतरत्र हलवण्याची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडे केली आहे. बांगलादेशी खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत वाढत्या चिंतेमुळे बोर्डाने हा टोकाचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश सरकारच्या सल्ल्यानुसार आणि सध्याची परिस्थिती पाहता, आपली टीम सध्या भारतात खेळण्यासाठी जाणार नाही, असे बीसीबीने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे बांगलादेशने मुस्तफिजुर रहमानच्या वादानंतर पाकिस्तानच्या मार्गावर चालण्याचे ठरवले आहे. त्यांनी आयसीसीला याबाबत एक पत्रही पाठवले आहे.
खेळाडूंची सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता – बीसीबी
A brave decision from Bangladesh cricket board regarding T20 world cup 2026👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻#BCB#WorldCup2026 #BangladeshCricket pic.twitter.com/KELEikV5Fm
— Muzammal Hassan (@muzammaldgr) January 4, 2026
बीसीबीच्या मते, हा निर्णय खेळाडू, संघ अधिकारी, बोर्डाचे सदस्य आणि इतर भागधारकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. संघाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सुरक्षित वातावरणाची गरज असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. “आयसीसी ही परिस्थिती समजून घेईल आणि या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढेल,” अशी आशा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे.
हेही वाचा – Pakistan Squad Announce : टी-२० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; सर्वात मोठ्या ‘मॅचविनर’ला केलं बाहेर!
कोलकात्यातील सामन्यांवर टांगती तलवार –
बांगलादेशचे ग्रुप सी मधील बहुतांश सामने कोलकात्यात होणार आहेत, जे आता धोक्यात आले आहेत. आता बीसीबीच्या मागणीवर आयसीसी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वेळापत्रकानुसार बांगलादेशचे सामने –
- ७ फेब्रुवारी: विरुद्ध वेस्ट इंडिज (कोलकाता)
- ९ फेब्रुवारी: विरुद्ध इटली (कोलकाता)
- १४ फेब्रुवारी: विरुद्ध इंग्लंड (कोलकाता)
- १७ फेब्रुवारी: विरुद्ध नेपाळ (मुंबई)
मुस्तफिजुर रहमानला मोठा धक्का; आयपीएलचे एनओसी रद्द
याच वादाच्या पार्श्वभूमीवर, बीसीबीने आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला आयपीएल (IPL) खेळण्यासाठी दिलेले ‘अनापत्ति प्रमाणपत्र’ (NOC) तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहे.
बीसीबी अधिकारी आणि संबंधित विभागांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा अर्थ असा की, जर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला खेळण्याची परवानगी दिली, तरीही बीसीबी सुरक्षेच्या कारणास्तव त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची मुभा देणार नाही.





