Jay Shah Award : महिला क्रिकेटला नवी दिशा देणारे जय शाह ‘उत्कृष्ट कामगिरी’ पुरस्काराने सन्मानित

Jay Shah won Outstanding Achievement award : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे अध्यक्ष जय शाह यांना सीएनएन न्यूज१८ च्या ‘इंडियन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात भारतीय महिला क्रिकेटमधील योगदानासाठी ‘उत्कृष्ट कामगिरी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. शुक्रवारी आयोजित या कार्यक्रमात शाह यांनी हा पुरस्कार स्वीकारताना, तो संपूर्ण भारतीय महिला क्रिकेटला आणि नुकताच आयसीसी महिला वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला समर्पित केला.
यावेळी शाह म्हणाले, “हरमन (हरमनप्रीत कौर) इथे उपस्थित आहे. झूलन (गोस्वामी) दी आणि मिताली (राज) देखील इथे आहेत आणि हा पुरस्कार मी तुम्हा सर्वांना समर्पित करू इच्छितो.” तसेच शाह यांनी समान वेतन आणि डब्ल्यूपीएल सुरु करण्याच्या निर्णयांना आपल्या मनाच्या सर्वात जवळचे निर्णय असल्याचे सांगितले.
महिला क्रिकेटमधील ऐतिहासिक निर्णय –
🏅 Jay Shah wins Indian of the Year – Outstanding Achievement!
Truly deserved. From pay parity to the WPL revolution, he changed the heartbeat of Indian cricket. ❤️
“Women gave men competition,” he said with pride. #IndianCricketTeam
A leader who lifted the whole game. 🇮🇳🔥… pic.twitter.com/iSmt5XL2aZ— Fan (@ayush9196) November 28, 2025
जय शाह आयसीसी अध्यक्ष होण्यापूर्वी डिसेंबर २०२४ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेतले.
- वेतन समानता (Pay Parity): पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन (Same Match Fee) लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय.
- महिला प्रीमियर लीग (WPL): डब्ल्यूपीएलची यशस्वी सुरुवात, ज्यामुळे महिला क्रिकेटला व्यावसायिक ओळख मिळाली.
- अन्य योगदान : देशांतर्गत क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) विस्तारीकरण करणे.
हेही वाचा – SMAT 2025 : अर्शिन-शॉची हैदराबादविरुद्ध तुफान फटकेबाजी; महाराष्ट्राचा ८ गडी राखून दणदणीत विजय!
महिला क्रिकेटच्या भविष्याला नवी दिशा –
Jay Shah Honoured for Transforming Global Cricket 🏆
‘Jai Hind, Jai Bharat’ ICC Chairman Jay Shah has been awarded CNN-News18 Indian of the Year 2025 – Outstanding Achievement, recognising his pivotal role in modernising cricket and expanding the sport’s global reach.#JayShah… pic.twitter.com/JEkB07x6hQ
— News18 (@CNNnews18) November 29, 2025
जय शाह यांनी प्रेक्षकांची विक्रमी संख्या वाढवण्यात आणि खेळाच्या व्यावसायिक दृष्टिकोनाला आधुनिक स्वरूप देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या निर्णयामुळे क्रिकेटला नवीन दर्शक, नवीन बाजारपेठा आणि बदलत्या मीडिया परिस्थितीशी जुळवून घेणे शक्य झाले.
हेही वाचा – Rohit Sharma : रोहित-विराट २०२७ चा वर्ल्डकप खेळणार की नाही? बीसीसीआयच्या ‘या’ बैठकीत ठरणार
याचा थेट फायदा भारतीय महिला क्रिकेटला झाला. नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनल सामन्यातील प्रेक्षकांच्या संख्येने मागील सर्व विक्रम मोडले. प्रेस रिलीजनुसार, ज्याप्रकारे १९८३ च्या विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला होता, त्याच प्रकारे हा बदल महिला क्रिकेटच्या भविष्याला नवी गती आणि दिशा देईल.





