टोकियो – जपानचे मवीन पंतप्रदान म्हणून माजी परराष्ट्र मंत्री फुमिओ किशिदा यांची आज संसदेत अधिकृतपणे निवड करण्यात आली. योशिगिदे सुगा यांच्या जागेवर किशिदा यांची नवीन पंतप्रदान म्हणून निवड करण्यात आली आहे.
आज सुगा यांनी आपल्या मंत्रिमंडळासह आपला राजीनामा दिला. किशिदा आणि त्यांच्या मंत्रिमंडलाचा आजच शपथविधी झाला. त्यांच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये माजी पंतप्रधान शिंझो आबे आणि त्यांच्याही पूर्वीचे पंतप्रधान तारो आसो यांच्या मंत्रिमंडळातील मातब्बर मंत्र्यांचा समावेश आहे.
मृदूभाषी असलेले किशिदा यांनी यापूर्वीच पंतप्रधान बनण्याची आपली महत्वाकांक्षा व्यक्त केली होती. सहकाऱ्यांमध्ये सतैक्य घडवून आणण्याचा त्यांचा स्वबाव आहे. मात्र सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता फारच कमी आहे. सपरराष्ट्र मंत्री म्हणून त्ययांनी केलेल्या प्रमुख कामांमध्ये दक्षिण कोरियाबरोबरचा युद्धकालिन कुंटणखान्याबद्दलचा कराराचा फेरआढावा आणि अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा यांची अणुबॉम्बस्फोटाच्या स्मारकाला भेटीचा विशेष उल्लेख करता येऊ शकेल.
लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते म्हणून किशिदा यांची निवड यापूर्वीच करण्यात आली होती. त्यांच्यासमोर जपानमधील करोनाच्या साथीला आटोक्यात आणण्याचे प्रमुख आव्हान असणार आहे. याव्यतिरिक्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे आव्हानही त्यांच्यासमोर असणार आहे. याशिवाय जपानमधील सार्वत्रिक निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यांचेही आव्हान किशिदा यांच्यासमोर असणार आहे.