मुंबई – डेटिंग आणि नातेसंबंधातील समस्या आपल्या सर्वांनाच घडतात. पण नात्यामधील हा गुंतागुंत माहीत असूनही, प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी त्यात अडकतो. आता बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने या नात्याबद्दल खुलेपणाने आपलं मत मांडलं आहे. जान्हवीने स्पष्टपणे सांगितले आहे की स्टैंडर्ड पाळणे म्हणजे गर्व असणे नव्हे तर आपल्या आवडेल त्याची निवडक करणे होय, जान्हवी कपूरने रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी टिप्स दिल्या आहेत.
जान्हवी म्हणाली, ‘स्वतःवर प्रेम केल्याने तुम्ही अधिक पात्र असल्याचे तुम्हाला कळत असते. जो तुम्हाला पात्र समजत नसेल तुमचं यश समजून घेत नसेल अशा व्यक्ती साठी कधीही मागे खेचू नका. नात्यात सुंदरतेपेक्षा एक मेकांना समजून घेण्याला महत्व द्यायला हवे. एका मॉडर्न महिलेच्या विचाराने मी शिकले आहे की, हाई स्टैंडर्ड का होना नखरे करणे नव्हे, तर आपल्या स्वःताला महत्व देणे आहे. यामुळे तुम्ही ओळखू शकता कि तुम्ही स्वःताला किती डिजर्व करता.
ती पुढे म्हणाली की, जेव्हा डेटिंगचा प्रश्न येतो तेव्हा प्रामाणिकपणा सर्व काही आहे. डेटिंग म्हणजे खेळ नाही, वास्तविक भावना तुम्हाला प्रेम करणे शिकविते’ असंही जान्हवीने सांगितले आहे,
जान्हवीच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, जान्हवीने नुकतेच जंगली पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार होणारा ‘उलझ’ साइन केला आहे. या चित्रपटात ती एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय ती मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे.