सर्व जिल्ह्यातील ग्राहक फोरम 31 ऑक्टोबर पासून रद्द
श्रीनगर/जम्मू – जम्मू काश्मीरातील सर्व जिल्ह्यांमध्ये ग्राहक फोरम बंद करण्याचा निर्णय राज्य प्रशासनाने घेतला आहे. येत्या 31 तारखे पासून हे फोरम बंद केले जाणार असून तेथील सर्व सदस्यांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. संबंधीत फोरममधील कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय विभागाकडे संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.
या फोरमकडील सर्व वाहने स्टेट मोटार गॅरेजकडे वर्ग करण्यास सांगण्यात आले असून या फोरमसाठी नवीन वाहने खरेदीचे प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. या फोरमची सर्व कार्यालये, त्यांच्याकडील सर्व सामग्री आणि फर्निचर त्या त्या जिल्ह्यातील नागरी पुरवठा खात्याने ताब्यात घ्यावीत असा आदेश राज्य प्रशासनाने काढला आहे.
जम्मू काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभागणी केली जाणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनतर त्यांची स्वतंत्र पुनर्ररचना केली जाणार आहे.