पर्यटन वाढीसाठी ब्राझील सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
साओ पाउलो : ब्राझीलच्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर जायर बोल्सोनारो यांनी भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ब्राझीलमध्ये आता भारत आणि चीनच्या नागरिकांना विनाव्हिस प्रवेश मिळणार आहे. ब्राझीलमधील पर्यटन वाढीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
यापुढे भारत आणि चीनच्या नागरिकांना ब्राझीलला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. दोन्ही देशांच्या दरम्यान पर्यटक आणि व्यापार संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ब्राझीलने काही दिवसापूर्वीच अमेरिका, कॅनडा, जपान आणि ऑस्ट्रेलियातील नागरिकांना व्हिसाची गरज नसल्याचे जाहीर केले होते.
यावर्षी ब्राझीलमधील निवडणुकीत जायर बोल्सोनारो हे राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. निवडून आल्यानंतर त्यांनी आपले धोरण आधीच जाहीर केले होते. त्यांचे सरकार हे विकसनशील देशांतील नागरिकांसाठी व्हिसाची गरज नाही, असे ब्राझीलने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बोल्सानारो यांचा लवकरच बिझींग दौरा होणार असून या दौऱ्याआधी त्यांनी भारत-चीन मधील नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली आहे.