पुण्याच्या पाहुण्याला जामखेडचे लग्न पडले महागात

साडेचार लाखांचे दागिने लंपास

जामखेड (प्रतिनिधी) – लग्न समारंभात नवरदेवाच्या परण्याची मिरवणूक पहात आसताना फीर्यादीच्या हातातील कापडी पिशवी नजर चुकवून ब्लेड च्या सहाय्याने कापून पिशवीतील साडेचार लाखांचे नऊ तोळे सोने अज्ञात चोरट्याने लंपास केले. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्याला हे लग्न मात्र खुपच महागात पडले.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की काल दि २४ रोजी लग्नाची खुप मोठी तारीख होती. याच दरम्यान शहरातील कर्जत जामखेड रस्त्यावरील त्रिमूर्ती मंगलकार्यालयात एक लग्न समारंभ झाला. मात्र लग्नापूर्वी पुणे येथुन आलेले फीर्यादी पाहुणे निलेश उद्धवराव देशमुख रा पुणे. हे मंगल कार्यालयातील पटांगणात नवरदेवाच्या परन्याची मिरवणूक बाजुला उभे राहून पहात थांबले होते.

याच दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास गर्दी चा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फीर्यादी च्या हातातील कापडी पिशवी ब्लेड च्या सहाय्याने कापून पिशवीतील साडेचार लाख रुपयांचे नऊ तोळे सोने लंपास केले. यानंतर उशिरा ही गोष्ट फीर्यादी च्या लक्षात आल्यावर त्यांना पोलीस स्टेशनला धाव घेतली.

त्यानंतर फीर्यादी निलेश देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.