IPL 2024 | Jake Fraser – आयपीएल 2024 मध्ये शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात 22 वर्षीय युवा खेळाडू जेक फ्रेजर मॅकगर्क आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्या शानदार फलंदाजीमुळे दिल्ली संघ विजयी झाला.
मॅकगर्कने त्याच्या आयपीएल पदार्पणात एक अर्धशतक झळकावले, तर पंतने ४१ धावांची खेळी खेळली. दिल्लीचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला. या सामन्यापूर्वी संघ दडपणाखाली होता, मात्र मॅकगर्कने दडपणाखाली शानदार खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले.
गेल्या काही दिवसांपासून मॅकगर्कबद्दल क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला सिक्सर हिटर म्हणतात. मॅकगर्क दक्षिण ऑस्ट्रेलियातून आला आहे आणि त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरेच षटकार मारले आहेत.
शुक्रवारीही त्याने लखनौचा स्टार फिरकीपटू कृणाल पंड्याच्या चेंडूवर तीन षटकार ठोकले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये मॅकगर्कने ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत.
जेक फ्रेझर मॅकगर्क यांचा जन्म ११ एप्रिल २००२ रोजी झाला आणि अलीकडेच त्यांनी२२ वा वाढदिवस भारतात साजरा केला. तो मूळचा व्हिक्टोरियाचा आहे. त्याने अनेक वयोगटांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
यामध्ये२०१९ च्या अंडर-१९ विश्वचषकाचाही समावेश आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये व्हिक्टोरियासाठी केलेल्या काही उत्कृष्ट कामगिरीमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला.
जेक फ्रेझर मॅकगर्कचे विक्रम :
१.२०१९-२० ऑस्ट्रेलियाच्या शील्ड आणि मार्श कपमध्ये पदार्पणातच अर्धशतक
२. लिस्ट-ए मध्ये सर्वात वेगवान म्हणजे २९ चेंडूंत शतक
३. ३८ टी-२० सामन्यात, १३५.१३ च्या स्ट्राइक रेटने ७०० धावा
४. ३८ टी-२० सामन्यात ४६ चौकार आणि ४० षटकार
५. आयपीएल पदार्पणातच ५५ धावांमध्ये दोन चौकार आणि पाच षटकार
६. जेक फ्रेझर कोणत्याही संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर पदार्पण करताना दुसरी सर्वात मोठी खेळी