काजोल दिसणार जयललिता यांच्या अभूमिकेत?

मुंबई- सध्या संपूर्ण बॉलिवूड मध्ये बायोपिकची जोरदार चलती आहे. आणि त्यातच आता, तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री ‘जयललिता’ यांच्या आयुष्यावरील एक बायोपिक लवकरच येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडची अभिनेत्री ‘काजोल’ जयललिता यांची भूमिका साकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जयललिता यांच्या रोलसाठी काजोल आणि अमला पॉल यांना विचारण्यात आले आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक केथीरेड्डी जगदीश्वर रेड्डी यांनी सांगितले की, “या चित्रपटाबाबत काजोल व अमलाशी आमचं बोलणे सुरु आहे. आम्ही त्यांना स्क्रिप्ट पाठवली असून, आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघत आहोत. असं रेड्डी यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, सगळ्या गोष्टी योग्य जुळून आल्या तर ऑगस्ट २०१९ मध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार आहे. सध्या त्यांचे सहकारी चित्रपटासाठी लागणारे संशोधन करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here