डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई – नायर रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याप्रकरणी फरार झालेल्या तीन डॉक्‍टरांपैकी भक्ती मेहेर हिला मंगळवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना देखील अटक केली होती. या तिघींनी सातत्याने केलेली जातीवाचक शेरेबाजीच डॉ. तडवी हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनाविण्यात आली होती.

31 मे रोजी पोलीस कोठडीची शिक्षा संपल्यानंतर तिन्ही आरोपी महिला डाॅक्टरांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)