Italy PM Georgia Meloni – इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी पती अँड्रिया जियाम्ब्रुनोपासून विभक्त झाल्या आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. मेलोनीच्या पतीने नुकतीच आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर जॉर्जियाने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
मेलनीने फेसबुकवर लिहिले,’माझे 10 वर्षांचे आंद्रिया जियाम्ब्रुनोसोबतचे नाते इथे संपते. आमचे मार्ग काही काळ वेगळे झाले होते आता ते स्वीकारण्याची वेळ आली आहे. या जोडप्याला 2006 मध्ये एक मुलगी आहे.’
तीन महिन्यांत दोन आक्षेपार्ह टिप्पण्या
जॉर्जिया मेलोनीचा नवरा आंद्रिया जियाम्ब्रुनो एका सुप्रसिद्ध इटालियन वृत्तवाहिनीचा अँकर आहे. अलीकडेच दुसर्या मीडियाने जिआम्ब्रुनोच्या कार्यक्रमाचे ऑफ-एअर उतारे प्रसारित केले. यामध्ये जियामब्रुनो एका महिलेशी अर्वाच्य भाषेत बोलताना दिसला. त्याने महिलेशी प्रेमसंबंध असल्याची चर्चा केली.
जिआम्ब्रुनोने महिलेला सांगितले की, ‘जर तिचे त्याच्याशी शारीरिक संबंध असतील तर तो तिला अधिक उंचीवर नेऊ शकेल. यानंतर मेलोनीच्या पतीवर बरीच टीका झाली. याआधी ऑगस्टमध्ये, सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पीडितेला दोषी ठरवत त्यांनी केलेल्या टिप्पण्यांबद्दलही त्याच्यावर टीका झाली होती.’
ऑगस्टमध्ये ती म्हणाली होती, ‘जर तुम्ही पबमध्ये डान्स करण्यासाठी गेलात तर तुम्हाला दारू पिण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशा परिस्थितीत कोणताही गैरसमज किंवा कोणत्याही प्रकारची समस्या नाही. पण जर तुम्ही दारू पिण्यास नकार दिला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
जॉर्जिया मेलोनीबद्दल जाणून घ्या…
मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. मेलोनी अत्यंत उजव्या नेत्या आहेत. 2022 च्या निवडणुका जिंकून त्यांनी इतिहास रचला होता. मेलोनीवर एलजीबीटी विरोधी, फॅसिस्ट आणि इस्लामोफोबिक असल्याचा आरोप आहे. मात्र, याबाबत त्या नकार करतात.