तेल अबीब – इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने एका अनोख्या अशा पेहरावाचा शोध लावला असून सैनिकांनी हा पेहराव परिधान केल्यावर सैनिक एक प्रकारे अदृश्य होतात हा पेहराव परिधान करताच सैनिकांची छबी दिसेनाशी होतं त्या ठिकाणी एखाद्या खडकाची किंवा दगडाची छबी दिसू लागते.
हा पेहराव म्हणजे एक प्रकारची जाळी असून ती जाळी अंगावर घालताच अशा प्रकारचा देखावा निर्माण होतो युद्धाच्या प्रसंगात शत्रू राष्ट्राच्या सैनिकांना आपले सैनिक दिसू नयेत म्हणून इस्त्रायलने हे अनोखे संशोधन केले आहे.
ही जाळी दोन रंगांची तयार केली असून एका बाजूला एक रंग असून दुसऱ्या बाजूला दुसरा रंग आहे एका बाजूचा रंग हिरवा असून दुसर्या बाजूचा रंग साधारण वाळूच्या रंगाप्रमाणे आहे परिस्थितीप्रमाणे ही जाळी उलटी सुलटी परिधान करून अदृश्य होता येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या जाळीचा पेहराव परिधान करणारा सैनिक थर्मल डिटेक्टर मध्येही पकडला जाऊ शकत नाही आणि लांब वरून पाहणार्याला दुर्बिणीतून सुद्धा हे सैनिक नजरेस येत नाहीत.
संरक्षण मंत्रालयातील डिटेक्टर आणि इमेजिंग टेक्नोलॉजी शाखेचे प्रमुख गल हरारी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या पेहरावाची चाचणी यशस्वी झाली असून लवकरच हे पेहराव सैनिकांना देण्यात येणार आहेतहे अनोखे पेहराव म्हणजेच ही जाळी एकदम वजनाने हलके असून त्यांचे वजन फक्त 500 ग्रॅम आहे तसेच हे पेहराव संपूर्णपणे वॉटरप्रुफ असून युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना नेण्यासाठी स्ट्रेचर म्हणूनही या पेहरावाचा वापर करणे शक्य होणार आहे 225 किलोपर्यंत वजन हे पेहराव पेलू शकतात अशी माहितीही त्यांनी दिली.