मुंबई – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे खरंच आजारी आहेत हे पटवून द्या, असे निर्देश मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मलिक यांनी ईडीने केलेल्या अटके विरोधात जामिनासाठी अर्ज केला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात जामिनावर तातडीच्या सुनावणीसाठी आलेल्या मलिक यांना कोर्टाने निर्देश दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान मलिकांना कोणताही गंभीर आजार नसल्याचा दावा अंमलबजावणी संचलानालयतर्फे (ईडी) करण्यात आला. त्याचबरोबर मलिकांच्या जामिनासाठीची याचिका फेटाळून लावण्याची मागणी ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान केली.
नवाब मलिकांच्या जामिनावरील सुनावणी आठवडाभरासाठी तहकूब करण्यात आली आहे. पुढील 21 फेब्रुवारीच्या सुनावणीत मलिकांच्या वैद्यकीय स्थितीवर युक्तिवाद करण्याचे वकिलांना कोर्टाने निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
किडनी अहवालावर अद्याप निर्णय नाही
नवाब मलिक यांच्या मुत्रपिंड (किडनी) तपासणीचा अहवाल मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. यावर मुंबई सत्र न्यायालय आपला निर्णय देणार आहे. यामुळे मलिक यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार की कारागृहात रवानगी होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून अहवाल मागविण्यात आला होता. मलिक कुटुंबियांनी न्यायालयात 3 नेफ्ट्रोलॉजिस्टची नावे सादर केली होती.