IPL 2024 (SRH vs CSK Match 18, Playing 11) : आज पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) समोर आहे सनरायझर्स हैदराबाद, ज्यांनी आयपीएलच्या या मोसमात या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएल 2024 हंगामातील 18 वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना 7.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांना त्यांच्या मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे सीएसके आणि हैदराबाद विजयी ट्रॅकवर परत येण्याकडे लक्ष देतील.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा बाजूनं लागला आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक(Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी हैदराबादने संघात दोन बदल केले आहेत, तर सीएसकेने तीन बदल केले आहेत.
हैदराबाद संघात मयंक अग्रवालच्या जागी नितीश रेड्डीला स्थान मिळाले आहे, तर नटराजनचे संघात पुनरागमन झाले आहे. सीएसकेचा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना आजारी असल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. सीएसकेने या सामन्यासाठी मोईन अली, महेश तिक्षाना आणि मुकेश चौधरी यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.
🚨 Toss Update 🚨@SunRisers win the toss and elect to bowl against @ChennaiIPL.
Follow the Match ▶️ https://t.co/O4Q3bQNgUP #TATAIPL | #SRHvCSK pic.twitter.com/kS6PwFAl0a
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2024
SRH vs CSK : दोन्ही संघाचे प्लेइंग 11 खालीलप्रमाणे….
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
इम्पॅक्ट सब : ट्रॅव्हिस हेड, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी.
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षाना.
इम्पॅक्ट सब : शार्दुल ठाकूर, शेख रशीद, मिचेल सँटनर, समीर रिझवी, मुकेश चौधरी.
हैदराबादने या मोसमात आत्तापर्यंत 3 सामने खेळले असून केवळ एकच सामना जिंकला आहे. गेल्या सामन्यात त्यांचा गुजरात टायटन्सने 7 गडी राखून तर कोलकाता नाईट रायडर्सने ४ धावांनी पराभव केला होता. तर हैदराबादने मुंबईवर 31 धावांनी विजय मिळवला होता. हा सामना ऐतिहासिक ठरला. हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली होती. त्यामुळे आज सीएसकेसाठीही विजय सोपा नसेल. हेन्रिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा हैदराबादसाठी गेम चेंजर ठरू शकतात.
दरम्यान, चेन्नईने या मोसमात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने त्यांनी जिंकले आहेत. मात्र तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. हैदराबादविरुद्ध सीएसकेची एकूण कामगिरी चांगली झाली आहे. चेन्नईने आतापर्यंत हैदराबादचा 15 सामन्यांमध्ये पराभव केला आहे. तर हैदराबादने केवळ 5 सामने जिंकले आहेत.