Live Cricket Score, RR vs RCB Indian Premier League 2024 : आज, IPL 2024 च्या 19 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) सोबत होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यास संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होईल.
आरसीबीची या मोसमात आतापर्यंतची कामगिरी काही विशेष ठरली नाही आणि त्यांनी आतापर्यंत चारपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे, तर राजस्थानचा संघ सध्या स्पर्धेत अपराजित आहे आणि त्यांनी आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. सध्या राजस्थान रॉयल्स 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 4 सामन्यांत 2 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (Toss) कौल हा राजस्थान रॉयल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक (Toss) जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे सौरव चौहानने आरसीबीसाठी पदार्पण केले आहे.
🚨 Toss Update 🚨
Rajasthan Royals win the toss and elect to field against Royal Challengers Bengaluru.
Follow the Match ▶️ https://t.co/IqTifedknm#TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/5l5wvoXLMM
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2024
RR vs RCB Live : दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरे, शिमरन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट सब : रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : विराट कोहली. फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सौरव चौहान, रेने टोपली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
इम्पॅक्ट सब : सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशाक, स्वप्नील सिंग
IPL 2024 (SRH vs CSK Match 18) : ‘हे’ तीन खेळाडू ठरले सीएसकेच्या पराभवास कारणीभूत…
दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ एकूण 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये आरसीबीने 15 वेळा आरआरचा पराभव केला आहे. तर, आरआरने 12 वेळा सामने जिंकले आहेत. दोघांमधील 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.