Live Cricket Score, LSG vs GT Indian Premier League 2024 : आज, IPL 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यास 7.30 वाजता सुरूवात होणार आहे. लखनौ या सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न करेल, तर गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करणाऱ्या गुजरातकडे पुनरागमनाचे लक्ष असेल.
आयपीएल सामन्यांच्या रेकॉर्डनुसार एकना स्टेडियमवर एकूण 8 सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ तीन वेळा यश मिळाले आहे. या मैदानाच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांच्या खात्यात 56.7 टक्के विकेट्स आल्या आहेत. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज एकानामध्ये वर्चस्व गाजवणार असल्याचे स्पष्ट होते.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपरजायंट्सच्या बाजूनं लागला आहे. लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
.@LucknowIPL, toss tumhaara, 𝙜𝙚𝙣𝙙𝙗𝙖𝙖𝙯𝙞 hamaari! 🙌 #AavaDe | #GTKarshe | #TATAIPL2024 | #LSGvGT
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 7, 2024
दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये, लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. यासह ते गुणतालिकेत 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत. GT 4 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही नवीन संघ आहेत आणि त्यांचा फक्त तिसरा आयपीएल हंगाम खेळत आहेत. आयपीएलमध्ये दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. गुजरात टायटन्सने हे चारही सामने जिंकले आहेत. एलएसजीला अद्याप जीटीसमोर विजयाचे खाते उघडता आलेले नाही.