Live Cricket Score, RR vs GT, Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 24 वा सामना बुधवारी(10 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरमध्ये खेळला गेला. गुजरात टायटन्सने रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्सचा 3 गडी राखून पराभव केला. राजस्थानचा या मोसमातील हा पहिलाच पराभव आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 7 गडी गमावून अखेरच्या चेंडूवर हा सामना जिंकला.
गुजरातच्या विजयात राशिद खानने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 11 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. राहुल तेवतियाने 22 धावा केल्या. शुभमन गिलने सर्वाधिक 72 धावांची खेळी केली. साई सुदर्शनने 35 पण महत्वपूर्ण धावा केल्या. राजस्थानकडून गोलंदाजी करताना कुलदीप सेनने 3 बळी घेतले. युजवेंद्र चहलने 2 बळी घेतले. आवेश खानने 1 बळी घेतला.
गुजरातला शेवटच्या 3 षटकात 42 धावांची गरज होती, राहुल तेवतिया आणि शाहरुख खानच्या रूपाने दोन तुफानी फलंदाज क्रीजवर होते. शाहरुखच्या 8 चेंडूत 14 धावांच्या खेळीने गुजरातच्या विजयाच्या आशा उंचावल्या, मात्र तो आवेश खानच्या हातून बाद झाला. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी 15 धावांची गरज होती. अखेर राशिद खानने शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारून आयपीएल 2024 मध्ये मागील 4 सामन्यापासून सुरू असलेला राजस्थानचा विजयरथ रोखला.
आवेश खान डावाच्या शेवटच्या षटकात 15 धावांचा बचाव करू शकला नाही, ज्यामुळे राजस्थानला आयपीएल 2024 मध्ये पहिल्या पराभवाची चव चाखावी लागली.
तत्पूर्वी, गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि राजस्थानला प्रथम फलंदाजीची संधी दिली. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळताना 20 षटकात 3 बाद 196 धावसंख्येपर्यंत मजल मारली.
If Jos and Jaiswal won’t get you, Sanju and Riyan will. 👊 pic.twitter.com/sBr0J6UCqU
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 10, 2024
राजस्थान रॉयल्सची टॉप ऑर्डर यावेळीही संघर्ष करताना दिसली. गेल्या सामन्यात जोस बटलरने शतक झळकावले होते, मात्र यावेळी तो केवळ 8 धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वालचा फॉर्म चिंतेचा विषय असून, तो केवळ 24 धावा करू शकला. राजस्थानकडून सर्वाधिक धावा रियान परागने केल्या, ज्याने 48 चेंडूत 76 धावा केल्या. त्याच्याशिवाय संजू सॅमसननेही 38 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारासह नाबाद 68 धावांचे योगदान देत आरआरला 190 धावांच्या पुढे नेले. शेवटच्या षटकांमध्ये, शिमरॉन हेटमायरने 5 चेंडूत 13 धावांची छोटी खेळी खेळून धावसंख्येला हातभार लावला.
राजस्थान संघाला 10 षटकात 2 गडी गमावून केवळ 73 धावा करता आल्याने एका क्षणी ते संघर्ष करत होते. येथून कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पुढच्या 5 षटकांत 61 धावा केल्या, त्यामुळे 15 षटकांत आरआरची धावसंख्या 134 धावा झाली. रियान पराग आणि संजू सॅमसन थांबायला तयार नव्हते, जे सतत मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होते. पण 19व्या षटकात मोहित शर्माच्या चेंडूवर रियान परागने आपली विकेट गमावली. सॅमसन आणि पराग यांच्यात 130 धावांची भागीदारी झाली. तर परागने 76 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार ठोकले. तर राजस्थानच्या खेळाडूंनी शेवटच्या 10 षटकात 122 धावा केल्या.
IPL 2024 (MI vs RCB Match 25) : मुंबई इंडियन्सविरुद्ध विराट कोहलीचे ‘असे’ आहेत रेकॉर्ड…
चांगल्या सुरुवातीनंतर गुजरातची गोलंदाजी ठरली अपयशी….
गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो सुरुवातीला त्यांच्यासाठी चांगला ठरला कारण राजस्थान रॉयल्सने केवळ 42 धावांच्या स्कोअरवर त्यांच्या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. येथून, संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी उत्कृष्ट भागीदारी केली आणि त्यांनी गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. रशीद खान व्यतिरिक्त, गुजरातमधील कोणीही चांगली गोलंदाजी करू शकला नाही कारण प्रत्येकाने 9 किंवा 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. उमेश यादव, मोहित शर्मा आणि राशिद खान यांनाच प्रत्येकी एक विकेट घेता आली.