जयपूर- आयपीएल 2023 च्या 60 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ने राजस्थान रॉयल्सचा 112 धावांनी पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 175 अशी धावसंख्या उभारली होती परंतु आरसीबीने आपल्या भेदक गोलंदाजीने राजस्थानला 10.3 षटकांत 59 धावांतच गुंडाळले. आरआरकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक 35 धावा केल्या.
त्याने 19 चेंडूंच्या खेळीत 1 चौकार आणि 4 षटकार मारला. तर इतर 8 खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. मागील सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वाल ने धडाकेबाज फलंदाजी केली होती मात्र आजच्या सामन्यात त्याने खाते देखील उघडले नाही. कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कलने 4-4 तर अॅडम जंपाने 2 आणि ध्रुल जुरेलने 1 धावा केल्या.
तर जो रूटने 10 धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून वेन पारनेलने तीन बळी घेतले. मायकेल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे. आजच्या विजयामुळे आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा अजूनही कायम आहेत.