नवी दिल्ली – देश-विदेशात योग प्रचार-प्रसारामध्ये भरीव कामगिरी केलेल्या माध्यमांच्या सकारात्मक व जबाबदारीपूर्ण भूमिकेची नोंद म्हणून माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्माना’चे नियोजन जून 2019 मध्ये केले आहे. हे 30 सन्मान 3 विभागात विभागलेले आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उद्या (7 जानेवारी) नवी दिल्ली येथे पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस माध्यम सन्मान’ प्रदान करतील.
‘योगाला बातमीदारीत सर्वोत्कृष्ठ स्थान देणारे वर्तमानपत्र’ या विभागात 11 सन्मान दिले जातील. ‘योगाला बातमीदारीत सर्वोत्कृष्ठ स्थान देणारी वृत्तवाहिनी’ या विभागात दिले 8 सन्मान जातील. ‘योगाला बातमीदारीत सर्वोत्कृष्ठ स्थान देणारी रेडिओ वाहिनी’ या विभागात दिले 11 सन्मान जाणार आहेत.
पदक, पट्टिका, चषक व प्रशस्तिपत्रक असे या सन्मानाचे स्वरूप असेल. मंत्रालयाला प्राप्त झालेल्या प्रवेशिकांचे परीक्षण सहा सदस्यांच्या परीक्षक मंडळाकडून होईल, ज्याचे प्रतिनिधित्व ‘प्रेस कॉन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सी. के. प्रसाद करतील.