India vs Australia 3rd ODI 2023: ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिकेेेचा शेवट विजयासह केला आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 66 धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही टीम इंडियाने ही मालिका 2-1 अशी जिंकली.
मात्र, प्रथमच वनडे मालिकेत कांगारू संघाविरुद्ध क्लीन स्वीप करण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सात गडी गमावून 352 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 49.4 षटकांत 286 धावांवर गारद झाला.
भारताकडून फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 81 धावा केल्या. विराट कोहलीने 56 धावांची आणि श्रेयस अय्यरने 48 धावांची खेळी खेळली, पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. रवींद्र जडेजाने 35 आणि केएल राहुलने 26 धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला आणि 18 धावा करून बाद झाला. सूर्यकुमारला केवळ आठ धावा करता आल्या. जसप्रीत बुमराहने पाच आणि कुलदीप यादवने दोन धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जोश हेझलवूडला दोन यश मिळाले. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन आणि तन्वीर संघाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत सात गडी गमावून 352 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकङून फलंदाजीत मिचेल मार्शने 84 चेंडूंत 13 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने 56, स्टीव्ह स्मिथने 74 आणि मार्नस लॅबुशेनने 72 धावांंचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने 10 षटकांत 81 धावा दिल्या तर कुलदीप यादवने 10 षटकांत 48 धावा देत 2 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येेेेकी 1 विकेट घेतली.