नवी दिल्ली – जगभरातील विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकामध्ये नेहमीच सर्वात मोठे सर्वात लहान सर्वात लांब अशा विविध गोष्टींची नोंद करण्यात येते आता या विक्रम पुस्तकात एका भारतीय महिलेने स्थान पटकावले असून जगात सर्वात जास्त लांब केस असा बहुमान तिच्या नावावर नोंदवण्यात आला आहे स्मिता श्रीवास्तव असे या 46 वर्षीय महिलेचे नाव असून ती उत्तर प्रदेशातील आहे तिच्या केसांची लांबी तब्बल सात फूट नऊ इंच एवढी आहे.
वयाच्या चौदाव्या वर्षापासून स्मिताने कधीही आपले केस कापले नाहीत 1980 च्या दशकातील हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रींपासून प्रोत्साहन घेऊन स्मिताने आपल्या केसांची काळजी घेण्यास प्रारंभ केला भारतीय संस्कृतीमध्ये केस कापणे हे अशुभ लक्षण मानले जाते तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक देवतांचे केसही लांब दाखवण्यात आले आहेत म्हणूनच मी कधीही माझ्या केसांना कात्री लावली नाही अशी माहिती स्मिताने दिली आहे.
या विक्रमाची नोंद घेतल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीप्रमाणे स्मिता आठवड्यातून दोन वेळा आपले केस धुते हे केस धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी तिला तब्बल तीन तासांचा कालावधी लागतो स्मिता जेव्हा आपल्या घरातून बाहेर पडते तिच्या तेव्हा तिच्या लांब सडक केसांकडे लोक बघतच राहतात अनेक लोक तिच्या केसांना हात लावून ते खरोखरच आहेत का हेही पाहतात आपल्या लांब सडक केसांची दखल गिनीज बुकने घेणे हे माझे एक स्वप्न होते आणि ते स्वप्नात पूर्ण झाले आहे अशी माहितीही स्मिताने दिली आहे.