मुंबई – बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातील ‘पसूरी नु’ हे नवीन गाणे नुकतंच रिलीज झाले आहे. हे गाणे पाकिस्तानी गायक अली सेठीचे आहे, जे टी-सीरीजने रिक्रिएट केले आहे. या गाण्याचा टीझर रिलीज झाल्यापासून पाकिस्तानी आणि भारतीय नेटकरी टी-सीरीजवर टीका करत आहेत.
गाणे शेअर करताना टी-सीरीजने सर्वत्र त्याचे लेखक आणि मूळ गायक अली सेठी यांना श्रेय दिले आहे. मूळ गाणे अली सेठी आणि फजल अब्बास यांनी लिहिले होते आणि अली सेठी आणि शे गिल यांनी गायले होते. कोक स्टुडिओ सीझन 14 मध्ये आलेल्या या गाण्याची खास गोष्ट म्हणजे शे गिलचे हे पहिले गाणे होते आणि या गाण्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.
pasoori ka matlab bhi pata hai inko? ye kya ishq mohabbat chala rakhi hai?😭
— 🍄 (@stfueanam) June 26, 2023
या गाण्याला 596 दशलक्ष म्हणजेच सुमारे 600 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला 72 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कोक स्टुडिओचे हे गाणे आले तेव्हा ते प्रसिद्ध झाले आणि हे गाणे सर्वांच्या ओठावर होते.
Aa chale, leke tujhe.. Hain Jaha Silsile… Feel The Magic of Love with Arijit Singh’s Midas Touch!#PasooriNu Song Out Now🤍 https://t.co/r428iSQ4qT#SajidNadiadwala #SatyaPremKiKatha #29thJune @advani_kiara @sameervidwans @shareenmantri @kishorarora19 @karandontsharma… pic.twitter.com/NXVpxbhk9C
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) June 26, 2023
सोशल मीडियावर देखील या गाण्याने धुमाकूळ घातला होता. दरम्यान, आता हे रिक्रिएट करण्यात आले असून, नेटकऱ्यांना हे नवीन व्हर्जन फारसं आवडलं नसल्याचं दिसून येत आहे. अनेक सोशल मीडिया यूजरने ट्विट करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात आहेत.