नवी दिल्ली – एफआयएच प्रो लीग हॉकी लढतांसाठी भारताने 20 सदस्यीय संघाची मंगळवारी घोषणा केली असून आघाडीवीर सुखजीत सिंग या नव्या चेहऱयाला त्यात संधी देण्यात आली आहे. भुवनेश्वरमध्ये स्पेनविरुद्ध भारतीय संघाची लढत होणार आहे.
26 व 27 फेब्रुवारी रोजी हे सामने होणार असून या लढतींसाठी भारताचे नेतृत्व मनप्रीत सिंग करणार आहे तर ड्रगफ्लिक स्पेशालिस्ट हरमनप्रीत सिंगकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. पंजाबचा 25 वर्षीय सुखजीत सिंग हा एकमेव नवा चेहरा या संघात दिसेल. गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या इंटरडिपार्टमेंट राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुखजीतने शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्याचा कोअर गुप खेळाडूंत समावेश झाला होता.
दोन्ही संघाची कामगिरी
– द.आफ्रिका व फ्रान्स यांच्याविरुद्ध झालेले चारपैकी तीन सामन्यात विजय
– तर स्पेनला इंग्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला
भारतीय पुरुष हॉकी संघ ः गोलरक्षक-श्रीजेश, सूरज करकेरा.
बचावफळी-हरमनप्रीत सिंग (उपकर्णधार), मनदीप मोर, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जर्मनप्रीत सिंग, दिप्सन तिर्की.
मध्यफळी-मनप्रीत सिंग (कर्णधार), विवेक सागर प्रसाद, हार्दिक सिंग, जसकरन सिंग, शमशेर सिंग, निलकांता शर्मा, आकाशदीप सिंग. आघाडी फळी-मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, शिलानंद लाक्रा, सुखजीत सिंग, अभिषेक.
राखीव खेळाडू ः कृष्ण बहादुर पाठक, अमित रोहिदास, राजकुमार पाल, एम. रबिचंद्र सिंग, दिलप्रीत सिंग.