मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)-भारतीय उद्योगपती अदाणी यांना ऑस्ट्रेलियातल्या मोठ्या खाण उद्योग प्रकल्पाला अंतिम मंजूरी मिळाली आहे. क्वीन्सलॅन्ड प्रांतातल्या ग्रेट बॅरिअर रीफ येथील कार्मिकेल कोळशा खाणीचा प्रकल्प वादात सापडला होता. मात्र ऑस्ट्रेलियातील निवडणुकीत स्कॉट मॉरिसन यांनी आश्चर्यकारकरितीने विजय मिळवल्यानंतर आठवड्याभराच्या आतच अदाणी यांच्या या खाण प्रकल्पाला अंतिम मंजूरी देण्यात आली. अदाणी समुहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी ही माहिती दिली आहे.
या प्रकल्पाला 31 मे रोजी क्वीन्सलॅन्ड राज्य सरकारकडून पहिली मंजूरी मिळाली होती. त्यासाठी या भागातील दुर्मिळ फिंच पक्ष्यांना धोका निर्माण न होऊ दिले जाणार नाही. त्यासाठी फिंच व्यवस्थापन कार्यक्रम आणि भूजल व्यवस्थापनाच्या कार्यक्रमांना मंजूरी मिळण्याचे मोठे आव्हान अदाणी समुहापुढे होते. ही मंजूरी मिळाली असल्याने अदाणी समुहाला आता खाण उद्योगाच्या कामाला सुरुवात करता येणर आहे.