नवी दिल्ली – करोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. देशात गेल्या 24 तासांत आलेल्या मृतांची संख्या सोमवारच्या तुलनेत तिप्पट आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी प्रसारीत केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत करोना संसर्गाचे 5 हजार 326 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, या कालावधीत 453 लोकांचा मृत्यू झाला, जो सोमवारच्या तुलनेत तिप्पट आहे.
India reports 5,326 new #COVID19 cases, 8,043 recoveries, and 453 deaths in the last 24 hours.
Active cases: 79,097
Total recoveries: 3,41,95,060
Death toll: 4,78,007Total Vaccination: 1,38,34,78,181 pic.twitter.com/45bi4eoFqL
— ANI (@ANI) December 21, 2021
गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 043 लोक करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3,41,95,060 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आता एकूण 79 हजार 097 सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे, एकूण मृतांच्या संख्या 4,78,007 वर पोहोचले आहे. एकूण बाधितांची संख्या 3,47,52,164 वर गेली आहे.