IND vs SL – यंदाचा महिला आशिया चषक ( Women’s Asia Cup ) बांगलादेशात खेळवला जात आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ आणि श्रीलंका महिला संघ आमने-सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे. भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने जेमिमाह रॉड्रिग्ज हिच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर श्रीलंकेला १५० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र श्रीलंकन संघ अवघ्या १०९ धावांतच गारद झाला आणि भारतने ४१ धावांनी सामना जिंकला.
भारतीय महिला संघाने आशिया चषक ( Women’s Asia Cup ) स्पर्धेत पहिल्याच सामन्यात विजयाला गवसणी घातली. भारताने दिलेल्या १५० धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकन संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक राहिली. श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. श्रीलंकेकडून हसिनी परेराने सर्वाधिक ३० धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजी करताना हेमलताने सर्वाधिक ३ बळी घेतले. पूजा वस्त्रकार आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. राधा यादवने एक गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिल. ( India Beat Srilanka by 41 runs in Women’s Asia Cup 2022 Frist Match )
5⃣0⃣ for @JemiRodrigues – her 8th in T20Is! 👏 👏
5⃣0⃣-run stand between her & captain @ImHarmanpreet! 👍 👍#TeamIndia 81/2 after 12 overs.
Follow the match ▶️ https://t.co/AoLf8lBmRP#AsiaCup2022 | #INDvSL
📸 Courtesy: Asian Cricket Council pic.twitter.com/WrMZtuixY0
— BCCI Women (@BCCIWomen) October 1, 2022
सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून श्रीलंकेने भारताला फलंदाजीस आमंत्रण दिले होते. भारताची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना स्वस्तात बाद झाल्या. मात्र, यानंतर आलेल्या जेमिमाह आणि कर्णधार हरामनप्रीत कौर यांनी भारताचा डाव सावरला. हरमनप्रीत ३० चेंडूत ३३ धावा करत बाद झाली. तसेच जेमीमाहने ५३ चेंडूत ७६ धावा करत भारताला चांगल्या स्थितीत पोहोचवले. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना ओशाडी रणसिंगे हिने सर्वाधिक ३ बळी घेतले होते.
WOMEN’S ASIA CUP. India Women Won by 41 Run(s) https://t.co/3iXm09LDTo #INDvSL #AsiaCup2022
— BCCI Women (@BCCIWomen) October 1, 2022