IND vs SA 2nd T20 Live Score : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (१२ डिसेंबर) खेळवला जात आहे. उभय संघांमधला हा सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पावसामुळे दुसरा टी-20 सामना थांबवण्यात आला आहे. भारताचा डाव संपणार होता तेव्हा पाऊस आला आणि पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. खेळ थांबला तेव्हा भारताने 19.3 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 180 धावा केल्या होत्या. रिंकू सिंग हा 39 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावावर नाबाद आहे. मोहम्मद सिराज खाते न उघडता नाबाद आहे.
UPDATE – Rain stops play in the 2nd T20I at St George’s Park.#TeamIndia 180/7 after 19.3 overs.https://t.co/0sPVek9NdO #SAvIND pic.twitter.com/8KbhFaOOxA
— BCCI (@BCCI) December 12, 2023
भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने 56 धावांची खेळी केली. टिळक वर्माने 29 तर रवींद्र जडेजाने 19 धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि अर्शदीप सिंग यांना खाते उघडता आले नाही. जितेश शर्माला एक धाव काढता आली.
IND vs SA 2nd T20 : कर्णधार मार्करमचा गोलंदाजीचा निर्णय! ऋतुराज संघाबाहेर, जाणून घ्या Playing 11…
दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत जेराल्ड कोएत्झीने तीन बळी घेतले. मार्को जॅनसेन, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि एडन मार्करन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.