डिकसळ-येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून भिगवण (ता. इंदापूर) येथे शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता, बेरोजगार, मजूर, निराधार उपाशी झोपणार नाही, यासाठी आमच्या मार्गदर्शक आदरणीय खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी, इंदापूर बसस्थानक, इंदापूर बाजार समिती, भिगवण या ठिकाणी एकुण 500 शिवभोजन थाळी उपलब्ध होणार असल्याचे सांगून शिवभोजन योजना इंदापूर तालुक्यासाठी तातडीने मंजूर केली आहे. त्यापैकी निमगाव केतकी व भिगवण शहरात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. गरजूंना अवघ्या पाच रुपयांमध्ये शिवभोजन थाळी उपलब्ध होणार आहे, असे राज्यमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलीस अधिकारी जीवन माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, शंकर गायकवाड, सरपंच अरूणा धवडे, उपसरपंच ललिता जाडकर, सचिन बोगावत, अण्णासाहेब धवडे, अजिंक्य माडगे, प्रदिप वाकसे, महेश शेंडगे, जयदीप जाधव, धनंजय थोरात, संदिप वाकसे, लालाआबा धवडे, प्रभाकर जाडकर, मनोज राक्षे, रामहरी चोपडे, रोहित हेळकर, संपत बंडगर, रियाज शेख, बापूराव थोरात, अमोल देवकाते, प्रशांत शेलार, अप्पासाहेब पवार, अप्पासाहेब गायकवाड, सुंदर कुसाळकर, जावेद शेख, बापुराव थोरात, विठ्ठल म्हस्के, संतोष धवडे उपस्थित होते.