आळंदी – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव, व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भौतिक सुविधांच्या माध्यमातून भव्य कलादालन (कै. दत्तात्रय मारुती आढाव कलादालन) उभारले आहे. शनिवारी (दि. 18) राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते कलादालनाचे उद्घाटन होणार आहे.
डॉ. ह. भ. प. नारायण महाराज जाधव, उद्योजक रमेश सदाशिव आढाव, शिल्पकार बापूसाहेब झांजे, कलाशिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष किरण सरोदे, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ अध्यक्ष मिलिंद शेलार, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थितीत उद्घाटन होणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी दिली.