नेवासा – खासदार लोखंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून जैनपूर (ता.नेवासा) येथील कापरीनाला खोलीकरण व रुंदीकरण (१ कोटी ४९ लाख रुपये) कामाचा शुभारंभ शनिवारी (दि.९) सकाळी ११ वाजता शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची असल्याची माहिती नेवासा तालुका शिवसेना प्रमुख सुरेशराव डिके व खा.लोखंडे यांचे स्वीय सहाय्यक शिवाजी दिसागत यांनी दिली.
खासदार लोखंडे यांच्याहस्ते जैनपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्याचे भूमिपजन तसेच जैनपूर गावातंर्गत रस्त्याचे भूमिपजन तसेच वैशिष्ठपुर्ण योजनेतील हायमास्ट दिव्यांचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे. नेवासा शहरातील खुल्या व्यायाम शाळेचे भूमिपुजन तसेच माका येथील खासदार लोखंडे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सभामंडपाचा भूमिपूजन सभारंभ होणार आहे.
महालक्ष्मी हिवरे येथे महालक्ष्मी हिवरे ते झिरपा वस्ती रस्त्याचे भूमिपूजन तसेच जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती तसेच गायके वस्ती शाळा बोअरवेल व पाण्याची टाकी तसेच सौर उर्जा व स्ट्रिस्ट लाईट कामाचा लोकार्पण सोहळा खासदार लोखंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश डिके, महिला आघाडी प्रमुख मीराताई गुंजाळ, शहरप्रमुख बाबा कांगुणे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.