धनकवडी परिसर : 94 मंडळे विसर्जन मिरवणुकीत सामील
निर्माल्य कचरा 34 टन 36 ठिकाणी विसर्जन हौद व संकलन केंद्र
विविध ठिकाणी फिरते विसर्तन हौद एकूण 30,992 मूर्ती संकलित केल्या गेल्या.
कात्रज/धनकवडी, दि. 10 (प्रतिनिधी) -कात्रज गावठाण, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, धनकवडी, बालाजी नगर, सुखसागर नगर, आंबेगाव पठार या परिसरामध्ये अनंत चतुर्दशी दिवशी पारंपरिक ढोल-ताशांचा गजर तसेच साउंड सिस्टिम व विविध डिस्को लाइट ट्रॅक्टर ट्रॉलीवर बसवण्यात आल्या होत्या. दुपारपासूनच विसर्जन मिरवणुका पाहण्याकरिता नागरिक धनकवडी, बालाजी नगर, कात्रज रस्त्यावर आल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते.
धनकवडीत प्रभात मित्र मंडळाने पारंपरिक वाद्यात विसर्जन मिरवणूक काढली. गणेश मित्र मंडळ यामध्ये विघ्नहर्ता ढोल पथक होते, वनराई कॉलनी मित्र मंडळ अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा पालखी सोहळा केला होता, तानाजी नगर मित्र मंडळ मिरवणूक मध्ये ग्रामीण पारंपरिक गणेश तरुण मंडळ भाटघर यांचा ढोल ताशा पथक धनकवडी मध्ये गणेश भक्तांना भावला. संध्याकाळी धनकवडी गावठाणातून अनेक मुख्य गणेश मंडळे मिरवणुकीमध्ये सामील झाली.
यामध्ये प्रामुख्याने जयनाथ गणेश तरुण मंडळ, अखिल धनकवडी गाव आलिशान तरुण मंडळ, श्री शिवछत्रपती तरुण मंडळ, आदर्श मित्र मंडळ, अखिल चैतन्य नगर गणेश मंडळ, बालाजी नगर परिसरामध्ये संयुक्त मित्र मंडळ तसेच राणा प्रताप मित्र मंडळ सहभागी झाले होते. कात्रज गावठाणमधून मानाचा अजिंक्य भैरवनाथ गणेश मित्र मंडळाचा पारंपारिक वारकरी भजनी मंडळी व डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली यानंतर सुदर्शन मित्र मंडळ मयुरेश्वर रथ व एकरूप मित्र मंडळ क्राऊन रथ यांनी देखील मोठ्या दिमाखात एलईडी स्क्रीनवर डीजे च्या तालावर विसर्जन मिरवणूक काढली.