बंद केलेल्या प्रक्षेपण्स्थळ पुन्हा सक्रिय
सेऊल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने त्याच्या सोहे उपग्रह प्रक्षेपण साइटवरून अत्यंत महत्त्वाची चाचणी केली आहे, अशी माहिती दक्षिण् कोरियाची सरकारी माध्यम संस्था “केसीएनए’ने रविवारी दिली. हे रॉकेट टेस्टिंग ग्राऊंड उत्तर कोरियाने बंद करण्याचे वचन दिले होते, असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले होते. अमेरिकेसमवेत रखडलेल्या अणुविरूद्धकरण चर्चेदरम्यान चाचणीचा नवीन मार्ग असू शकेल, असा इशारा उत्तर कोरियाने दिला होता.
ही संभाव्य तयारी थांबवण्यासाठी उत्तर कोरियाला वर्षभराची अंतिम मुदत दिली गेली आहे. ही मुदत आता संपत आली आहे. शनिवारी “केसीएनए’च्या वृत्तात या चाचणीस “खूप महत्वाची यशस्वी चाचणी’ असे संबोधले गेले आहे. परंतु काय चाचणी घेण्यात आली हे स्पष्ट केलेले नाही.
सोहे स्थित असलेल्या टोंगाचांग-रीसह उत्तर कोरियाच्या प्रमुख साइट्सवर लक्ष ठेवण्याच्या कार्यात दक्षिण कोरिया आणि अमेरिका लक्षपूर्वक सहकार्य करीत आहेत. असे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
“क्षेपणास्त्र चाचणीची सहसा शेजारच्या दक्षिण कोरिया आणि जपानकडून दखल घेतली जाऊ शकते. त्यामुळे कदाचित उत्तर कोरियाने रॉकेट इंजिनाच्या क्षेपणास्त्र चाचणी करण्याऐवजी स्थिर तपासणी केली असावी.’ असे क्षेपणास्त्र तज्ज्ञांनी सांगितले.