नेवासा – शेतकऱ्यांचे कपात केलेले १०९ रुपये प्रति टनाप्रमाणे एफआरपीमधील पेमेंट तसेच शेतकऱ्यांचे चालू हंगामातील थकीत उसाचे पेमेंट व कामगारांचे थकीत पगार ऊस उत्पादक सभासद शेतकरी व कामगाराच्या खात्यावर दोन दिवसात जमा करा अन्यथा कारखान्याच्या प्रवेशव्दारासमोर सोमवारपासून उपोषण करणार असल्याचे निवेदन भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी कारखाना व्यवस्थापनाला दिले आहे.
पावसाळा सुरू झालेला आहे शेतकऱ्यांची ऊस लागवड नवीन पिकांच्या पेरणी करण्यास सुरुवात झालेली आहे तसेच शाळा – कॉलेज चालू झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची चणचण भासत असतांना शेतकरऱ्यांचे हक्काचे पेमेंट कारखाना व्यवस्थापनाने जाणून बुजून करत न करता शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे असा आरोप माजी आमदार मुरकुटे यांनी निवेदनाव्दारे केला आहे.
सरसकट कपात केलले १०९ रुपये प्रति टनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे अन्यथा सोमवार (दि.१०) पासून कारखाना प्रवेशव्दारासमोर उपोषण करण्याचा इशारा माजी आमदार मुरकुटे यांनी दिला आहे.