वॉशिंग्टन :- भारतीय वंशाचा कॅनडाचा नागरिक आणि 26-11 च्या हल्ल्यातील आरोपी तहाव्वूर राणाने केलेली प्रत्यार्पणविरोधी याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी बायडेन प्रशासनाच्यावतीने अमेरिकेती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारताने राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. मे महिन्यात अमेरिकेतील न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिली आहे. मात्र भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येऊ नये, या मागणीसाठी राणाने याचिका दाखल केली आहे. राणा सध्या लॉस एंजेलिसमधील कोठडीमध्ये आहे.
भारताच्या मागणीवरून राणाला अमेरिकेत 10 जून 2020 रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताच्यावतीने करण्यात आली होती. भारताची ही मागणी बायडेन प्रशासनाने मान्य केली आहे.
प्रत्यार्पणाला विरोध करणारी याचिका राणाने न्यायालयात दाखल केली असली, तरी ही याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती बायडेन प्रशासनाने न्यायालयात केली आहे.