मुंबई – जर तुम्ही काही काळ मागे गेलात तर तुम्हाला दिसेल की पूर्वी लोकांना प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी बँकेत जावे लागत होते. खाते उघडण्यापासून ते पैसे काढणे आणि जमा करण्यापर्यंत बँकेत जाणे बंधनकारक होते. मात्र आता काळ बदलला असून बँकेशी संबंधित बहुतांश कामे घरात बसूनच चुटकीसरशी केली जातात. पैसे पाठवण्यापासून ते बँकेत पैसे जमा करणे आणि कर्ज घेणे ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे आणि इंटरनेट बँकिंग ग्राहकांना यामध्ये मदत करते.
परंतु तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही तुमची इंटरनेट बँकिंग सुरक्षित ठेवली पाहिजे, अन्यथा फसवणूक करणारे तुमचे कष्टाचे पैसे पापणी लवायच्या आत रिकामे करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
* पासवर्ड वारंवार बदला आणि स्ट्रॉंग ठेवा
तुम्हाला तुमची नेट बँकिंग सुरक्षित हवी असेल आणि फसवणूक करणारे तुमची फसवणूक करू नयेत असे वाटत असेल तर, त्यासाठी तुम्हाला तुमचा पासवर्ड खूप स्ट्रॉंग ठेवावा लागेल. तसेच वेळोवेळी पासवर्ड बदलत राहावे लागेल. सहसा 1234567 किंवा RAMESH12345 हे सोपे पासवर्ड असतात. याऐवजी तुम्ही AI!ELCE@409872#$ सारखा पासवर्ड वापरू शकता.
* इतर कोणत्याही प्रणालीवर लॉग इन करू नका
तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुमची नेट बँकिंग कोणाच्याही लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर लॉग इन करू नका. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. सायबर कॅफे, मित्र, कार्यालय किंवा कोणत्याही अज्ञात प्रणालीवर चुकूनही नेट बँकिंग लॉगिन करू नका. हे नेहमी सुरक्षित प्रणालीवर करा.
* कोणत्याही वेबसाइटवर बँकिंग डिटेल्स सेव्ह करू नका
तुमची फसवणूक होऊ द्यायची नसेल, तर चुकूनही तुमची बँकिंग माहिती कोणत्याही थर्ड पार्टी वेबसाइटवर सेव्ह करू नका. उदाहरणार्थ, जेव्हा बरेच लोक ब्राउझर किंवा कोणत्याही शॉपिंग वेबसाइटवर नेट बँकिंगसह लॉग इन करतात तेव्हा ते त्यांचा आयडी आणि पासवर्ड तेथे सेव्ह करतात, जेणेकरून ते पुन्हा जातात तेव्हा त्यांना त्यांची माहिती पुन्हा प्रविष्ट करावी लागणार नाही. पण असे कधीही करू नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.
*अज्ञात दुवे (लिंक्स) टाळा
आजकाल ईमेल, मेसेज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी लिंक्स लोकांना पाठवल्या जातात, ज्यामुळे तुमची बँकिंग माहिती चोरली जाते किंवा तुमची सिस्टीम आणि मोबाईल हॅक होतो. त्यामुळे त्यांच्यावर कधीही क्लिक करू नका आणि विशेषत: ज्या संगणकावर किंवा मोबाइलवर तुमचे नेट बँकिंग लॉगिन आहे त्यावरून तर अजिबात अनोळखी लिंक क्लिक करू नका.