व्हीव्हीपॅट विषयी खोटी तक्रार केल्यास जेलची हवा

पुणे – ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या व्हीव्हीपॅट ((व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) मशीनच्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत सात सेंकद दिसणार आहे. जर एखाद्या मतदाराने मतदान केलेल्या पक्षाचे चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनवर दिसले नाही. दुसऱ्याच उमेदवाराचे अथवा पक्षाचे चिन्ह त्याच्यावर दिसले अशी तक्रार केल्यास नाही ती तक्रार खोटी ठरल्यास संबधित मतदाराला जेलची हवा खावी लागणार आहे. याप्रकरणी संबधित मतदाराला सहा महिन्यांची कैद अथवा एक हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.

शिरूर व मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि.29) मतदान होणार आहे. दरम्यान पुणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी (दि.23 ) अशी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाली होती. त्या व्यक्तीविरुध्द जिल्हा प्रशासन कारवाई करणार आहे. निवडणुक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणुक आयोगाने पावले उचलेली आहेत. ईव्हीएम मशीनच्या वापराबरोबरच आता व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात येणार आहे. या सुविधेमुळे मतदाराला आपण नोंदवलेले मत प्रत्यक्ष त्याच उमेदवाराला मिळाले असल्याची खात्री पटणार आहे.

सर्व मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाणार आहे. त्यामुळे मतदारांना आपण नोंदविलेले मत त्याच उमेदवाराला मिळाले का याची खात्री पटणार आहे. मात्र जर एखाद्या मतदाराने मतदानकरतेवेळी या व्हीव्हीपॅट वर आक्षेप नोंदविला आणि ज्या उमेदवारला मत दिले त्या उमेदवाराचे चिन्ह व्हीव्हीपॅट न दिसता दुसऱ्याच उमेदवाराचे चिन्ह दिसले अशी तक्रार केली तर त्या तक्रारीची दखल संबंधित मतदान केंद्रस्तरीत अधिकारी घेणार आहे. संबधित मतदाराला खरच असा प्रकार घडला आहे का, याची विचारणा अधिकारी करणार आहे. जर मतदार त्या तक्रारीवर ठाम असेल तर त्या मतदाराकडून एक अर्ज भरून घेतला जाणार आहे. या अर्जामध्ये जर मतदार खोटे बोलत असेल तर सहा महिने शिक्षा अथवा एक हजार रुपये दंड होऊ शकतो. या नियमाची माहिती या अर्जामध्ये असणार आहे. त्यानंतर त्या मतदाराला पुन्हा टेस्ट व्होट ची संधी दिली जाणार आहे. यावेळी त्या मतदारासोबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान केंद्रावरील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि साक्षीदार उपस्थित राहणार आहे. जर टेस्ट व्होट मध्ये मतदार खोटे बोलत असल्याचे सिध्द झाल्यास त्या मतदाराला जागेवरच पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here