मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री झरिन खानने पदार्पणातच सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटात काम केले आहे. तिने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवल्यानंतर तिची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जात होती. तिला कतरिना कैफची जुळी अभिनेत्रीचा टॅगही बसला होता. त्यानंतर तिची अनेक वेळा कतरिनाशी तुलना केली जात होती. मात्र याचा परिणाम तिच्या करिअरवर झाल्याचे ती सांगते. कतरिनासारखी दिसत असल्याने तिला संधीच मिळाली नसल्याचे तिने सांगितले आहे.
अलीकडेच, झरीनने Reddit वर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन केले. त्यावेळी तिने अनेक युजर्सच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तिने ‘हाय, मी झरीन खान आहे. मी ‘वीर’, ‘रेडी’ आणि ‘हाऊसफुल २’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. तुम्ही मला चित्रपट, माझ्या भूमिका, अभिनय, माझे जीवन, माझा प्रवास आणि इतर अनेक विषयांवर प्रश्न विचारू शकता!’ असे लिहिले होते. त्यावर अनेकांनी तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. एका युजरने झरिनला कतरिना कैफशी झालेल्या तुलनेबाबत प्रश्न विचारला होता. ‘बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात लोक तुझी तुलना कतरिना कैफशी करत होते. तेव्हा तुला काय वाटायचे आणि त्याचा तुझ्यावर काय परिणाम झाला?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर झरीनने देखील उत्तर दिले आहे.
झरीन म्हणाली की, “जेव्हा मी या इंडस्ट्रीत आले तेव्हा मी खरोखरच हरवलेल्या मुलासारखी होते कारण माझ्याकडे चित्रपटाची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे कतरिनाशी तुलना केल्यावर मला खूप आनंद झाला. मी पण तिची चाहती आहे. पण त्याचा माझ्या करिअरवर मोठा परिणाम झाला, कारण या इंडस्ट्रीतील लोकांनी मला माझे व्यक्तिमत्व सिद्ध करण्याची संधीतच दिली नाही.”
View this post on Instagram
यापूर्वी देखील झरिनने एका मूलाखतीमध्ये कतरिनासारखं दिसण्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे सांगितले होते. अनेक दिग्दर्शकांनी तिला डुप्लीकेट असल्याचे कारण देऊन काम नाकारले असल्याची खंत झरिन खानने व्यक्त केली होती. दरम्यान, झरिनने ‘वीर’ नंतर ‘हाऊसफुल 2’, ‘हेट स्टोरी 2’, ‘अक्सर 2’ चित्रपटात काम केले आहे.