मुंबई – अनेकदा विविध शहरातील सिग्नलवर किन्नर पैसे मागत असल्याचे चित्र पाहायला मिळते.नुकतंच एका अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हा अभिनेता चक्क किन्नर बनून सिग्नलवर पैसे मागताना पाहायला मिळतोय. लाल साडी,केसात गजरा घालून हा अभिनेता हुबेहूब एखाद्या किन्नरप्रमाणे सिग्नलवर पैसे मागताना दिसून आला आहे.
सिग्नलवर पैसे मागणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता शरद मल्होत्रा आहे. यावेळेसचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता किन्नरप्रमाणे तयार होऊन ट्रॅफिक सिग्नलवर जाताना दिसत आहे. शरद मल्होत्राचा मेकअप इतका परफेक्ट आहे की त्याला ओळखणेही कठीण आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला त्याने हा सर्व मेकअप आणि ड्रेसअप कसा केला हे दाखवण्यात आले आहे. तर नंतर तो थेट सिग्नलवरील वाहनांकडून पैसे मागून घेऊन आपल्या ठेवताना पाहायला मिळतो. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले असून त्याचा अभिनय पाहून लोक त्याचे कौतुक करत आहेत.
हा सर्व घाट अभिनेत्याने आपल्या आगामी मालिकेसाठी केल्याचे समजते. शरद मल्होत्राची ‘हनी ट्रॅप स्क्वाड’ ही मालिका लवकरच अल्ट बालाजी या ओटीटीवर सुरु होणार आहे. म्हणूनच ‘प्रमोशनसाठी काय पण’ म्हणत अभिनेत्याने चक्क किन्नर प्रमाणे आपली वेशभूषा केली आणि तो सिग्नलवर पैसे मागू लागला.
View this post on Instagram
शरद ‘हनी ट्रॅप स्क्वाड’मध्ये एका डार्क व्यक्तिरेखेत दिसणार आहे. यामध्ये तो डब्बेवाला, एक सरदार आणि किन्नर अशा चार वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसणार आहे. ‘हनी ट्रॅप स्कॉड’ ही एक इंटरेस्टिंग मालिका असणार आहे. शरद नुकताच एका म्युझिक व्हिडिओमध्ये आकांक्षा पुरीसोबत दिसला होता, जी या शोमध्ये देखील काम करत आहे.