बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या आमिर, शाहरुख आणि सलमान या तिन्ही खानांपेक्षा आपण जरा कमीच यशस्वी आहोत, असे या इंडस्ट्रीतील चौथा खान अर्थात छोटे नवाब सैफ अली खानने म्हटले आहे. या तिघांपेक्षा आपल्याला जरा कमी यश मिळाले हे जरा बरे झाले, असेही तो म्हणाला आहे.
View this post on Instagram
आमिर, शाहरुख आणि सलमान हे तिघेही ऍक्टर बनण्यासाठीच जन्माला आले आहेत. कदाचित लहानपणापासून त्यांचा, किमान दोघांचा तरी तोच उद्देश राहिला असावा.
सलमानची ऍक्टर बनण्याची महत्त्वाकांक्षा होती की नाही, ते माहित नाही.
View this post on Instagram
आपल्याबाबत मात्र तसे नव्हते, हे सैफ अगदी प्रांजळपणे कबूल करतो. अलीकडच्या काळात आपण भूमिकांबाबत चोखंदळ झालो असल्याने ऍक्टिंगचा आनंदही मिळतो आहे. याचे कारण आता अभिनयाची समज पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे, असे सैफ म्हणतो.
View this post on Instagram
बॉलीवूडमध्ये आपल्याला जम बसवण्यासाठी मदत केल्याबद्दल त्याने अक्षय कुमारचे आभारही मानले आहेत. या दोघांनी “ये दिल्लगी”, “मै खिलाडी तू अनाडी” आणि “टशन” सारख्या सिनेमातून एकत्र काम केले आहे. आमीरबरोबर त्याने “दिल चाहता है”मध्ये काम केले. पण शाहरुख आणि सलमानबरोबर अजून काम केलेले नाही.