मुंबई – अभिनेता इरफान खानने त्याच्या गंभीर आजारावर मात केली असून तो बॉलिवूडमध्ये परतला आहे. त्याच्या आजारामूळे तो चित्रपट सृष्टीपासून फार काळ दूर होता. ५२ वर्षीय अभिनेता इरफान मागील काही महिन्यांपासून लंडनमध्ये न्यूरो एंडोक्राइन ट्यूमर आजारावर उपचार घेत होता. त्यानंतर आज तो कर्करोगावर मात करत पुन्हा बॉलिवूडमध्ये परतला आहे.
GMB serving since 1900s It’s going to be fun to tell another story #AngreziMedium.
Coming soon, with Mr Champakji…
Aa Raha Hu phir entertain Karne Sabko #ItsTimeToKnowChampakJi #AngreziMedium📸 🕺🏻 pic.twitter.com/mC3IL2UMpf
— Irrfan (@irrfank) April 8, 2019
राजस्थानमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’ या आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण करतानाच एक फोटो इरफान खानने आपल्या ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये इरफान खान एका मिठाईच्या दुकानाबाहेर उभा राहिलेला दिसत आहे. २०१८ मध्ये इरफानचा ‘कारवां’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. इरफान पुन्हा परतल्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची वार्ता असेल.